sports

निगडीच्या मोहीत जगतापची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत बाजी

छत्तीसगडमध्ये झालेल्या स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक; सर्व स्तरांतून होतंय कौतुक

भारतीय अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार्‍या मोहीत संतोष जगताप याने 2000 मिटर धावणे प्रकारात 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.

कोरेगाव : भारतीय अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार्‍या मोहीत संतोष जगताप याने 2000 मिटर धावणे प्रकारात 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.

कोरेगांव तालुक्यातील निगडी गावचा सुपूत्र असलेला मोहित निगडीच्याच निजानंद रंगनाथ स्वामी विद्यालयात शिकत आहे. तर प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्यानंतर कोरेगांवच्या सोनेरी ग्रुपच्या वतीने खेळणार्‍या मोहितने आत्तापर्यंत दोन राष्ट्रीय स्पर्धांसह 12 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 

शहरी सुविधांचा अभाव असतानाही मोहितने जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोरेगावच्या डी. पी. भोसले कॉलेजच्या मैदानावर सकाळ, संध्याकाळ दररोज दोन वेळा सराव करुन हे यश संपादन केले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मैदान उपलब्ध नसतानाही त्याने रस्त्यावरुन, डोंगर, द्यातून धावत आपला दैनंदिन सराव कायम ठेवला आहे. सामान्य कुटुंबातील मोहितने शहरी मुलांपेक्षाही सरस कामगिरी करत 6.4 मिनिटांच्या वेळेसह 2000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर मिळविलेले सुवर्णपदक महाराष्ट्राच्या संघाला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात पूरक ठरले आहे. 

अवघ्या चौदा वर्षांचे वय असलेल्या मोहितकडून दररोज सराव करुन घेण्यासाठी त्याचे वडील संतोष जगताप यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. मोहित सोबत सराव, स्पर्धा या प्रत्येक ठिकाणी संतोष जगताप आपली सगळी कामे बाजूला ठेवून उपस्थित असतात. 

गेल्या सात वर्षात अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळेच हे यश मिळाल्याचे सांगून मोहितचे वडील संतोष जगताप म्हणाले, 2027 सालची ऑलंपिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोहितचा दैनंदिन सराव सुरु आहे. आमचा सराव मातीच्या मैदानावर होत असतो आणि स्पर्धा मात्र सिंथॅटिक्स मैदानावर होत असतात, त्यामुळे ब्याच अडचणी उभ्या राहतात. सरावासाठी अपुरी साधने आणि दररोजचा आहार खर्च याचा मेळ घालणे अवघड होवून बसले आहे, तरीही दानशूरांच्या सहकार्याने मोहित प्रत्येक टप्प्यावर सरस कामगिरी करुन दाखवित असल्याचेही संतोष जगताप यांनी सांगितले.

दरम्यान, छत्तीसगड येथील स्पर्धेनंतर आता पुढील महिन्यात तिरुपती येथे होणा्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी मोहितने सुरु केली आहे. छत्तीसगड मध्ये मिळविलेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्राचा उद्योन्मुख धावपट्टू म्हणून मोहित पुढे येत आहे. धावपट्टीवर धावताना बघणा्यांच्या नजरा मोहितकडेच खिळून राहतात, एवढ्या आत्मविश्‍वासाने तो धावत असतो, शांत, संयमी असलेल्या मोहितकडे स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात बाजी मारण्याची कसब अत्यंत लक्षवेधी आहे. देश पातळीवर यश मिळविण्याच्या जिद्दीने तो धावतो आहे, त्याला गरज फक्त समाजातून मोठ्या पाठबळाची आहे. मिळालेल्या पाठबळावर तो निश्‍चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करुन दाखवेल हा विश्‍वास मोहितचे प्रशिक्षक आक्रमक मुजावर व सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे यांनी व्यक्त केला आहे.