sports

विद्यार्थ्यांना कवायतीने शारीरिक सामर्थ्य मिळेल

डॉ. सुभाष वाघमारे यांचे मत : छ. शिवाजी कॉलेजमध्ये पारंपरिक युद्ध कौशल्य कार्यशाळा संपन्न

‘सैनिकी शिक्षणात भारतीय स्वातंत्र्य चळवळ व संविधानाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. लोकशाहीचे रक्षण आणि हुकूमशाहीला विरोध ही जाणीव विद्यार्थी दशेपासून रुजवली पाहिजे. भारतीय संविधानातील हक्क आणि कर्तव्ये राष्ट्र छात्र दलास माहिती पाहिजेतच.कवायतीने शारीरिक सामर्थ्य मिळेल; पण विद्यार्थ्याला राष्ट्रातील वर्तमान घडामोडी माहीत असल्याच पाहिजेत. पारंपरिक सामाजिक विषमता आपण नाकारली असून, संविधानिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मूल्यांवरच देश पुढे नेणे आवश्यक आहे. जगाला बुद्ध हवा असू

सातारा : ‘सैनिकी शिक्षणात भारतीय स्वातंत्र्य चळवळ व संविधानाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. लोकशाहीचे रक्षण आणि हुकूमशाहीला विरोध ही जाणीव विद्यार्थी दशेपासून रुजवली पाहिजे. भारतीय संविधानातील हक्क आणि कर्तव्ये राष्ट्र छात्र दलास माहिती पाहिजेतच.कवायतीने शारीरिक सामर्थ्य मिळेल; पण विद्यार्थ्याला राष्ट्रातील वर्तमान घडामोडी माहीत असल्याच पाहिजेत. पारंपरिक सामाजिक विषमता आपण नाकारली असून, संविधानिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मूल्यांवरच देश पुढे नेणे आवश्यक आहे. जगाला बुद्ध हवा असून, जागतिक शांततेची गरज असते. पण देशाच्या हितासाठी, संरक्षणासाठी युद्ध करण्याची वेळ आली तर मनगटाचे व मेंदूचे सामर्थ्य उपयोगी ठरते. म्हणून युद्ध कौशल्य जीवनाचा अपरिहार्य भाग आहे.’ असे मत डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.  

येथील छ. शिवाजी कॉलेजमध्ये मिलिटरी सायन्स व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान योजनेंतर्गत शिवकालीन पारंपरिक युद्ध कौशल्य कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

प्रा. लेफ्टनंट केशव पवार यांनी स्वागतपर भाषणामध्ये विद्यार्थ्याना आधुनिक लष्करी प्रशिक्षण सोबत शिवकालीन पारंपरिक युद्ध कला आत्मसात करण्याचे आवाहन केले. मानवी जीवन हे संघर्षमय असल्यामुळे आपण आक्रमणाला तोंड देण्यासाठी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी ही शिवकालीन युद्ध कला प्रकार आवश्यक असल्याचे नमूद केले.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व छत्रपती शिवाजी मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिवकालीन पारंपरिक युद्धकौशल्याचा सराव केला. 

राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे कंपनी कमांडर प्रा. केशव पवार, अ‍ॅकॅडमी प्रशिक्षक हवालदार विक्रम घाडगे व सैनिक कमांडो अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक सागर लोहार, रोहित कांबळे, प्रिया मोरे, प्रीती लिंगायत यांनी विद्यार्थ्यांना लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी व धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर रायफल शूटिंगचेही प्रशिक्षण दिले.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. राम गाडेकर, बटालियन सिनिअर अंडर ऑफिसर सौरभ धानी, सिनिअर अंडर ऑफिसर नेहा कणसे, यश मोरे, काजोल पवार, सार्जंट खुशी जांगिड, अ‍ॅकॅडमी प्रशिक्षक मयुरी जाधव, अपूर्वा मुंद्रावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.