शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्व आवश्यक आहे. ज्यामुळे तज्ज्ञ देखील आपल्याला हेल्दी फूड खाण्याचा सल्ला देतात. परंतु या सगळ्यात शरीरासाठी जास्त गरजेचं आहे. ते म्हणजे व्हिटॅमिन डी. कारण, व्हिटॅमिन-डी तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही खूप महत्त्वाचे आहे.
शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात. याशिवाय पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही होऊ शकते. त्यामुळे नेहमीच व्हिटॅमिन-डी खात शरीराला मिळेल असे पदार्थ खात जा.
चला तर जाणून घेऊया शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कोणती लक्षणे आहेत आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा जेवणात वापर केला पाहिजे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे कोणती?
- पुरुष किंवा स्त्रियांमध्ये केस गळायला लागतात आणि टक्कल पडू शकतात.
- अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो
- जखमा बरे होण्यास वेळ लागतो
- हाडांची घनता कमी होऊन दे दुखू लागते
- रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण होऊ शकते
- स्नायू वेदना होऊ लागतात
- नैराश्य येऊ शकतं
- पाठ आणि हाडदुखीच्या समस्या इत्यादी
व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
व्हिटॅमिन-डी मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी सूर्यप्रकाश घेणे. परंतु, या व्यतिरिक्त, आपण व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचे सेवन देखील करू शकतो.
- केशर
- गाईचे दूध
- मशरूम
- अंड्याचा बलक
- सॅल्मन, मासे इत्यादी