मंगळवार पेठेतील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे शिवसेना गट आक्रमक
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना घेराव घालण्याचा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांचा इशारा
मंगळवार पेठेतील हेडगेवार चौकात उभारण्यात आलेल्या खाजगी विकसकाच्या इमारतीमुळे वर्दळीचा रस्ता हा केवळ काही मीटर शिल्लक राहिला आहे. हे अतिक्रमण सातारा पालिकेने तातडीने न काढल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जोरदार आंदोलन करेल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.
सातारा : मंगळवार पेठेतील हेडगेवार चौकात उभारण्यात आलेल्या खाजगी विकसकाच्या इमारतीमुळे वर्दळीचा रस्ता हा केवळ काही मीटर शिल्लक राहिला आहे. हे अतिक्रमण सातारा पालिकेने तातडीने न काढल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जोरदार आंदोलन करेल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.
सातारा शहरातील गोल मारुती, मंगळवार तळे रस्ता, सोहनीची गिरणी येथील अतिक्रमनाच्या संदर्भात मोहिते यांनी नगर रचनाकार, सहाय्यक संचालक नगर रचना, सातारा पालिका प्रशासन यांना वारंवार निवेदने देऊन येथील अतिक्रमणांच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. पण अजूनही त्या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. सोहनीची गिरणी येथील खाजगी विकसकाने बांधलेल्या इमारतीचा कोणताही सेटबॅक सोडलेला नाही. इमारतीच्या दर्शनी भागांमध्ये रस्त्याच्या अगदी कडेलाच पाण्याच्या टाक्या आणि सांडपाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे येथील रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.
हा रस्ता थेट रामाच्या गोट परिसराकडे जाणारा वर्दळीचा असून हेडगेवार चौकामध्ये वाहतुकीची कोंडी यामुळे निर्माण होणार आहे. विकसकाने इमारतीचा कोणताही सेटबॅक न सोडल्याने येथे अतिक्रमण निर्माण झाले आहे. या संदर्भात सातारा पालिकेने तातडीने कारवाई करावी अन्यथा येत्या सोमवारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना घेराव घालून शिवसेना आपल्याच स्टाईल आंदोलन करेल, अशा पद्धतीचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.