sports

मराठीचा समृद्ध वारसा सर्वांनी जपायला हवा

डॉ. प्रभाकर पवार : देऊरच्या प्रा. संभाजीराव कदम कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

‘आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी इतर भाषांचा राग अथवा अपमान करण्याची गरज नाही. फक्त एवढेच भान असायला हवे की, आधुनिक युगातील पिढीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीची गोडी कमी होत चाललेली आहे. इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा मानून मातृभाषेबद्दल कमीपणा वाटणे, मराठी भाषेचा परकेपणा वाटणे मराठी भाषिकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. अमृताते पैजा जिंकणार्‍या आपल्या मराठीला समृद्ध वारसा आहे. तो समृद्ध वारसा जपण्याची व मराठीचे महत्त्व वाढविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,’ असे आवाहन डॉ. प्रभाकर पवार या

देऊर : ‘आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी इतर भाषांचा राग अथवा अपमान करण्याची गरज नाही. फक्त एवढेच भान असायला हवे की, आधुनिक युगातील पिढीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीची गोडी कमी होत चाललेली आहे. इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा मानून मातृभाषेबद्दल कमीपणा वाटणे, मराठी भाषेचा परकेपणा वाटणे मराठी भाषिकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. अमृताते पैजा जिंकणार्‍या आपल्या मराठीला समृद्ध वारसा आहे. तो समृद्ध वारसा जपण्याची व मराठीचे महत्त्व वाढविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,’ असे आवाहन डॉ. प्रभाकर पवार यांनी केले. 

येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘बीजांकुर’ भित्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते.कुसुमाग्रज यांचे जीवनचरित्र व त्यांचे वाङ्मय आधारित लेख विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकात प्रदर्शित केले. भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी या भित्तीपत्रकास भेट दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. प्रभाकर पवार यांनी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनचरित्र व त्यांचे वाङ्मय यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत भोसले यांनी उपस्थितांना राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देवून मराठीचे वैभव वाढविणे, हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व अध्यापक उपस्थित होते. 

मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक शेलार यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. प्रा. सूर्यकांत आदाटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दत्तू मेंगाळ यांनी आभार मानले.