जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 34 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 34 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
18 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 7 व पिंपोडे येथील 11 अशा एकूण 18 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.