sports

जिल्ह्यात दिवसभरात 75 कोरोनाबाधित

बुधवारी 137 जण कोरोनामुक्त : एकूण रुग्णसंख्या 54,831

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 75 बाधितांची नोंद झाली असून, 137 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 75 बाधितांची नोंद झाली असून, 137 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 137 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 137 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

302 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, कराड 39, फलटण 7, कोरेगाव 6, वाई 32, खंडाळा 6, रायगाव 11, पानमळेवाडी 69, महाबळेश्‍वर 10, दहिवडी 30, म्हसवड 9, तरडगाव 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 40 अशा एकूण 302 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.