महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासला
अॅड. सुधीर ससाणे यांचे प्रतिपादन : देऊर महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
‘महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा उंचावलेला आहे. व्यवस्थापनातील एमबीएची पदवी घेऊनही जेवढे व्यवस्थापन कौशल्य येणार नाही त्यापेक्षाही कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थापनाचे कार्य महिला नियमितपणे लिलया करीत असतात. महिलांच्या रोजच्या अतुलनीय कामकाजाची दखल कोठेही घेतली जात नाही. वास्तविक, महिलांना रोजच्या दैनंदिन कामकाजात सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. यातूनच महिलांना प्रोत्साहन मिळण्याबरोबर समाजात चांगला संदेश जाईल,’असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सातारचे
देऊर : ‘महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा उंचावलेला आहे. व्यवस्थापनातील एमबीएची पदवी घेऊनही जेवढे व्यवस्थापन कौशल्य येणार नाही त्यापेक्षाही कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थापनाचे कार्य महिला नियमितपणे लिलया करीत असतात. महिलांच्या रोजच्या अतुलनीय कामकाजाची दखल कोठेही घेतली जात नाही. वास्तविक, महिलांना रोजच्या दैनंदिन कामकाजात सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. यातूनच महिलांना प्रोत्साहन मिळण्याबरोबर समाजात चांगला संदेश जाईल,’असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सातारचे अध्यक्ष अॅड. सुधीर ससाणे यांनी केले.
येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त
देऊर पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा रोटरी क्लब सातारा यांच्यातर्फे गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भारत भोसले होते.
प्राचार्य डॉ. भारत भोसले म्हणाले, ‘जागतिक स्तरावर महिलांवर होत असलेले अत्याचार व अन्यायाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. आजही स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होऊ शकली नाही. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आणि समाजाने विशेष दक्षता घेऊन स्त्रियांच्या सक्षमीकरण आणि समानतेसाठी पुढाकार घ्यायला हवा.’
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात ‘घे भरारी’ या महिला विशेषांक भित्तीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सारिकाताई चव्हाण (तळिये), रूपाली जाधव (दहिगाव), डॉ. संध्या पौडमल यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव हणमंतराव कदम, अरविंद कदम, सर्जेराव कदम, किसनराव कदम, भीमराव कदम, देवेंद्र कदम, बाळकृष्ण चव्हाण, रोटरीयन शशिकांत रसाळ यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे डॉ. अशोक शेलार प्रास्ताविक यांनी केले. प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संध्या पौडमल यांनी आभार मानले.