काळी मिरीचे फायदे


काळ्या मिरीमध्ये बर्‍याच प्रकारची खनिजं आणि विटामिन्सदेखील असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी 6 चं भरपूर प्रमाण आहे.

भारतीय मसाल्यांमध्ये मुख्य मसाला म्हणून काळी मिरीचा वापर करण्यात येतो. चव आणि त्याचा सुवास हे दोन्ही भारतीय पदार्थांमध्ये महत्त्वाचं असतं. काळी मिरीचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं नाव आहे. वैज्ञानिक नाव पायपर निग्राम असं असून याचा वापर औषध आणि मसाला असा दोन्ही करता येतो. यामध्ये असणार्‍या पिपेरिनमुळे याची चव ही खूपच तिखट असते. काळ्या मिरीमध्ये बर्‍याच प्रकारची खनिजं आणि विटामिन्सदेखील असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी 6 चं भरपूर प्रमाण आहे. या विटामिन्सशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हेदेखील सापडतं. या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या गुणकारी काळ्या मिरीचे सर्व फायदे आणि नुकसान सांगणार आहोत. काळी मिरी रही अतिशय उष्ण असते आणि त्यामुळेच याचे कितीही फायदे असले तरीही याचा वापर हा प्रमाणातच करायला हवा.
कडव्या चवीची काळी मिरी ही आपल्याला बर्‍याच तर्‍हेने उपयोगी असते. काही आजारांवर काळी मिरी हा अप्रतिम उपायही आहे. तुम्हाला कदाचित याबाबत काही माहीत नसल्यास, आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. पाहूया काय आहेत काळी मिरीचे फायदे.
भूक वाढवते
तुमच्या जेवणाची चव अधिक चांगली करण्याबरोबरच काळी मिरी तुमची भूक वाढवण्याचं काम चांगल्या प्रकारे करते. आपल्या सुवासाच्या माध्यमातून काळी मिरी तुमची भूक वाढवण्यास मदत करते. तुम्हाला जर कमी भूक लागत असेल तर, काळी मिरी आणि गुळाचं मिश्रण तयार करून तुम्ही खा. त्यामुळे तुम्हाला योग्य भूक लागेल.                                                      
कॅन्सरपासून संरक्षण
काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सीडंट असतात, जे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देण्यास मदत करतात. काळ्या मिरीमध्ये असणारे पिपेरिन हे कॅन्सरशी लढा देण्यामध्ये अग्रेसर असतं. प्रोटेस्ट कॅन्सरमध्ये वापरण्यात येणार्‍या किमोथेरपीमध्येदेखील पिपेरिन वापरण्यात येतं. त्यामुळे काळी मिरी कॅन्सरपासून तुमचं संरक्षण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलते.
काळी मिरीचे फायदे 
पचनशक्ती वाढवते
काळी मिरी टेस्ट बड्स उत्तेजित करते आणि पोटामध्ये हायड्रोक्लोरिक असिडचा स्रावदेखील वाढवते. त्यामुळे उत्कृष्ट आणि पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत मिळते. पचनाच्या सुधाराव्यतिरिक्त काळ्या मिरीमुळे पोटात सूज, पोट फुगणं, अपचन, पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठ या सगळ्या समस्यांपासूनही काळी मिरी सुटका मिळवून देते.
ताण दूर ठेवते
काळ्या मिरीमध्ये असणार्‍या पिपेरिनमध्ये अँटी ऑक्सिडंट गुण सापडतात. त्यासाठी काळ्या मिरीच्या सेवनाने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते.  
गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका
काही लोकांना बर्‍याचदा पोटामध्ये गॅस निर्माण होणं अथवा अ‍ॅसिडिटीचा सतत त्रास होत असतो. तुम्हालादेखील असा त्रास असेल तर लिंबाच्या रसामध्ये काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घालून तुम्ही चिमूटभर खा. तुम्हाला या त्रासापासून लवकरात लवकर सुटका मिळेल.
हिरड्यांचा कमकुवतपणा दूर होईल
तुमच्या हिरड्यांमध्ये दुखत असेल तर, काळी मिरी हा त्यावरील रामबाण उपाय आहे. काळी मिरी आणि काळं मीठ योग्य प्रमाणात एकत्र मिसळून घ्या. आता हे चूर्ण मोहरीच्या तेलात मिसळून दात आणि हिरड्यांना लावा आणि अर्धा तास लावून तोंड धुऊन घ्या.
जखम भरली जाते
तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल किंवा रक्त थांबत नसेल तर काळी मिरी कुटून त्यावर लावावी. काळी मिरी अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि दुःखनिवारक असते, यामुळे तुमची जखम लवकर भरते.
पोटातील जंतूंचा नाश होतो
खाण्यामध्ये काळी मिरी पावडरचा वापर केल्याने पोटातील जंतूंंचाही नाश होतो. काळ्या मिरीबरोबर बेदाणे खाल्ल्यास या समस्येपासून लवकर सुटका होते.
वजन कमी होते
काळ्या मिरीच्या बाह्य भागामध्ये फाईटोन्यूट्रिअंट्स असतात. ज्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते. तुमची साठलेली चरबी याच्यामुळे कमी होऊ शकते. हे तुमच्या शरीरातील टॉक्झिक तत्व आणि पाणी काढण्यासाठी फायदेखील ठरतं. त्यामुळे तुमचं वजन अगदी लवकर कमी होतं.
सर्दीपासून सुटका
काळ्या मिरीचा वापर केल्याने तुमचा कफ कमी होतो. तसंच तुमचं नाक भरलं असेल आणि तुम्हाला श्वास घ्यायला त्रासस होत असेल तर त्यासाठीदेखील तुम्हाला काळ्या मिरीचा वापर हा फायदेशीर ठरतो. यामध्ये रोगाणुरोधी गुण असतात. त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर, अशावेळी काळ्या मिरीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
गाठीवर उपचार
काळ्या मिरीमध्ये असणार्‍या पिपेरिनमध्ये अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटी गाठीचे गुण सापडतात. त्यामुळे तुम्हाला शरीरावर गाठ झाली असल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. काळ्या मिरीचं तेल हे तुमच्या त्वचेला उष्णता मिळवून देतं. त्यामुळे गाठीने पीडित असलेले लोक याचा वापर करू शकतात. त्याचा गाठ बरी होण्यासाठी उपयोग होतो.
त्वचेचे आजार होतात दूर
काळ्या मिरीमुळे विटीलिगो अर्थात त्वचा रोग, चेहर्‍यावरील सुरकुत्या आणि त्वचेसंबंधी अन्य समस्यादेखील दूर होतात.
कोंड्याची समस्या दूर होते
तुमच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या झाली असेल तर तुम्ही दह्यामध्ये 1 चमचा वाटलेली काळी मिरी त्यामध्ये मिसळा आणि ती तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर केस थंड पाण्याने धुवा. दुसर्‍या दिवशी केस शँपूने धुवा.
पिंपल्सपासून मिळवा सुटका
काळी मिरीचे 20 दाणे गुलाबपाण्यात वाटून रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा. रात्रभर तसंच ठेऊन तुम्ही सकाळी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने साफ करा. त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील पिंपल्स आणि सुरकुत्यांची समस्या संपुष्टात येईल आणि चेहरा साफ होईल.
हिस्टिरिया
या आजाराने पीडित महिलेला 1 ग्रॅम काळी मिरी आणि 3 ग्रॅम आंबट दही त्यामध्ये मिसळून दिवसातून कमीत कमी तीन वेळा खायला हवं.
अस्वस्थ वाटणं
तुम्हाला जर नेहमी अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही काळी मिरी खायला हवी. यामुळे तुमचा अस्वस्थपणा नाहीसा होईल.
चक्कर येणं
साखर आणि तूपामध्ये काळी मिरी पावडर घाला. हे खाल्ल्यामुळे तुम्हाला जर चक्कर येत असेल तर त्याचं प्रमाण कमी होईल.
आकडी येणं
कधी कधी शरीरामध्ये अचानक आकडी येते. त्यामुळे तुम्हाला अगदी हलायलादेखील त्रास होतो. अशावेळी काळी मिरी थंड पाण्यामध्ये वाटून घालावी आणि मग त्याचा लेप आकडी येणार्‍या माणसाच्या शरीराला लावावा. त्यामुळे तुमचं आकडी येण्याचं प्रमाण कमी होईल.
ताप
एखाद्याला ताप येत असेल तर काळ्या मिरीचा काढा करून त्या आजारी माणसाला पाजा. तसंच जर एखाद्याला मलेरिया झाला असेल तर काळ्या मिरीचं चूर्ण आणि तुळशीच्या रसामध्ये मध मिसळून पाणी प्यावं. त्यामुळे मलेरियाचा ताप लवकर बरा होतो.
कफवाला खोकला
काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये देशी तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून 3-4 वेळा 1-1 गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जातो. घसा एकदम साफ होतो.
रातांधळेपणा
या आजाराने पीडित लोकांनी काळ्या मिरीच्या बारीक चूर्णामध्ये दही घालून थोडं पाणी घालून सकाळ संध्याकाळ डोळ्यांमध्ये काजळासारखं लावावं. काही महिन्यांपर्यंत हा प्रयोग करत राहावा. यामुळे तुमचा रातांधळेपणा निघून जायला मदत होते.
उचकी बंद होते
तुम्हाला जेव्हा उचकी लागते आणि ती थांबत नसते तेव्हा काळ्या मिरीच्या चूर्णात मध घालून हे मिश्रण चाटावं. अगदीच जास्त प्रमाणात उचकी लागत असेल तर काळी मिरी तव्यावर जाळून त्याचा धूर घ्यावा. त्यामुळे तुमची उचकी थांबवण्यास मदत होते.
काळ्या मिरीमुळे होणारं नुकसान
काळी मिरी ही तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक आहे पण ही अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरासाठी नुकसानदायीसुद्धा ठरू शकते. त्यामुळे या काळ्या मिरीमुळे नक्की काय नुकसान होतं ते बघूया
1. पोटात जळजळ
काळी मिरी ही उष्ण असते. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास, पोटात जळजळ होते. ही जळजळ काही काळ तशीच राहते. काही कालावधीनंतर तर आपणहून ठीक होते.
2. जळजळ आणि दमा
सकाळी सकाळची जर तुम्ही काळ्या मिरीचा वास घेतलात तर तुम्हाला श्वासामध्ये जळजळ आणि दम्यासारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. युरीनमध्ये जळजळ होत असल्यास, काळी मिरी खाणं टाळा.
3. पोटदुखी
काळी मिरी जास्त खाल्ल्यास पोटदुखी सुरू होते. शिवाय तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टाईनलसारख्या आजारालाही तोंड द्यावं लागतं.
4. खाज आणि सूज
काळी मिरीची जर तुम्हाला अलर्जी असेल तर तुम्हाला त्वचेवर खाज, सूज आणि त्वचा लाल होणं अथवा रॅशेस येण्यासारखे प्रकार घडतात.
 5. गर्भावस्थेत शिशुला नुकसान
गरोदर आणि स्तनपान करणार्‍या महिलांनी काळी मिरी खाऊ नये. गरोदरपणामध्ये शरीराला मसाले खाणं हे काही प्रमाणात संवेदनशीर असतं. स्तनपानादरम्यान काळी मिरीच्या उष्णतेमुळे शिशुला नुकसान पोहचू शकतं.
 6. नाकातून रक्त येणे
उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ली तर तुमच्या नाकातून रक्त येण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
 7. आतड्यांना पोहचवतो नुकसान
काळी मिरीचा अत्याधिक वापर हा तुमच्या आतड्यांना नुकसानदायी ठरतो. तसंच यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्यामुळे याचा वापर तुम्ही योग्य प्रमाणात करायला हवा.
 8. डोळ्यामध्ये जळजळ
तुम्ही काळी मिरी अथवा काळी मिरी पावडर कधीही डोळ्यांच्या जवळ न नेणंच चांगलं. डोळ्यांमध्ये जळजळ त्यामुळे होऊ शकते. तुमच्या डोळ्यांना हानी पोहचण्याचीही यामुळे शक्यता निर्माण होते.
रोजच्या जेवणात कसा करावा काळी मिरीचा वापर
काळी मिरीचा वापर हा रोजच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्येही करण्यात येतो.
1. जेव्हा तुम्ही सूप बनवता तेव्हा त्यामध्ये स्वादासाठी काळी मिरी पावडरचा उपयोग करण्यात येतो.
2. घरी जेव्हा तुम्ही बर्गर किंवा सॉस असे पदार्थ बनवता तेव्हादेखील काळी मिरी पावडरचा वापर तुम्ही योग्य प्रमाणात चवीसाठी करू शकता. यामुळे तुमचे पदार्थ अति तिखट होत नाहीत आणि याचा स्वाद तुमचा पदार्थ अधिक रूचकर बनवतो.
3. तुम्हाला जर नॉनव्हेज पदार्थ खायची खूप आवड असेल तर तुम्ही पदार्थ शिजवण्यापूर्वी मांस, चिकन अथवा माशांवर ही काळी मिरी पावडर घालू शकता. त्यामुळे तुमच्या पदार्थांना अधिक रूचकर चव लागेल.
4. ऑम्लेट आणि पनीर सारख्या पदार्थांवर काळ्या मिरी पावडरचा उपयोग हा स्वादासाठी केला जातो. या पदार्थांबरोबर काळी मिरीचा स्वाद उत्कृष्ट लागतो.
5. उपवासासाठी करण्यात येणार्‍या काही बटाट्याच्या पदार्थांमध्येही काही जण काळ्या मिरी पावडरचा उपयोग करतात. काही ठिकाणी अर्थातच मसाल्याचा पदार्थ असल्याने काळी मिरी वापरली जात नाही. पण काही ठिकाणी उपवासाच्या पदार्थांना काळी मिरी खाणं योग्य मानलं जातं. तुमच्या आवडीनुसार याचा उपयोग करता येतो.
 काळी मिरीसंदर्भात प्रश्न - उत्तर - 
1. काळ्या मिरीने झोप निघून जाते का?
काळी मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. शिवाय मेंदूला ताजेपणा देणारे घटक काळी मिरीमध्ये असल्यामुळे झोप येत असताना जर तुम्ही काळी मिरी खाल्ली. तर मेंदू पुन्हा तरतरीत होतो आणि त्यामुळे झोप उडून जाते. त्यामुळे जर तुम्हाला अभ्यास अथवा काम करून रात्र जागवायची असेल तर तुम्ही काळी मिरीचा दाणा तोंडात चघळत ठेऊ शकता.
2. काळी मिरीमुळे वजन कमी होतं का?
काळी मिरीमध्ये वजन कमी करणारे घटक असतात. त्यामुळे चरबी बर्न होते. पण त्यामुळे अति प्रमाणामध्ये काळी मिरी खाऊ नये. त्याचे दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागतात. नक्की किती प्रमाणात काळी मिरी खायला हवी हे तुम्ही तुमच्या आरोग्याप्रमाणे जाणून घेणंही आवश्यक आहे.