maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा


मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याची सुमारास चिंचणी सातारा रस्त्यावरील साई संगम हॉटेल च्या समोर सुनील भटू सिंग गावित उर्फ भैय्या राहणार कोलदे, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार हा चालवत असलेल्या मोटरसायकल क्रमांक एमएच 16 व्ही 4420 ला अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून धडक देऊन सुनील गावित यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच अपघात स्थळी कोणतीही वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला. प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.