sports

वावहिरेत आराध्या खुस्पेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा


आराध्या प्रवीण खुस्पे हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त वावरहिरे जिल्हा परिषद शाळा येथे सातारा येथील जरग हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन बबनराव खुस्पे यांनी केले होते.

बिदाल : आराध्या प्रवीण खुस्पे हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त वावरहिरे जिल्हा परिषद शाळा येथे सातारा येथील जरग हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन बबनराव खुस्पे यांनी केले होते.

यावेळी डॉ. प्रवीणकुमार जरग म्हणाले, ‘ग्रामीण भागातील महिलांनी लहान बालकांची आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारने आरोग्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. तरुणांनी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. प्रवीणकुमार जरग, डॉ. प्रमोद राजभोई, डॉ. नीलेश बरकडे, डॉ. रेश्मा राजभोई, डॉ. अक्षय पवार, डॉ. दिनेश कदम यांनी मोफत तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. 

यावेळी सरपंच चंद्रकांत वाघ, उपसरपंच सुरेश काळे, महेश कचरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हणमंत अवघडे, मधुकर अवघडे, तुळशीराम यादव, प्रशांत विरकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.