तरुणाईची क्रेझ पिअर्सिंग

 ’नाक, कान टोचण्याची सध्या तरुण-तरुणींमध्ये क्रेझ आहे. मुलींबरोबरच मुलांमध्येही कान, नाक, भुवई टोचण्याचा प्रकार सर्रास नजरेस पडतो. पिअर्सिंग म्हणजे नाक किंवा शरीराच्या कोणत्याही अंगाला टोचून घेऊन आवडते दागिने जसे सर्जिकल स्टेलनेस स्टिल, सोने, प्लॅटिनम घालून तुम्ही मिरवू शकतात. फॅशनसाठी आता नाक आणि कानाशिवाय ओठ, जीभ, भुवई आणि नाभीमध्येही पिअर्सिंग केले जाते.

मात्र पिअर्सिंग करण्याअगोदर काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे की, तुम्हाला एखाद्या धातूची ऍलर्जी आहे किंवा नाही. विशेषतः सर्जिकल स्टेलनेस स्टिल, प्लॅटिनम या धातूमुळे काहींना पिअर्सिंगनंतर त्रास जाणवतो.पिअर्सिंग केल्यानंतर थोडे रक्त निघणे, सूज येणे असे प्रकार सहज घडू शकतात. बर्‍याच वेळा पिअर्सिंग केल्यानंतर त्या जागी फोड येतो. तो फोडू नये.
मात्र या समस्या अधिक वाढू नये याची खबरदारी घ्यायला हवी. नेहमी नवी सुई वापरायला हवी. जिथे टोचायचे आहे ती जागा अगोदर साबणाने स्वच्छ धुऊन कपड्याने साफ करून थोडा वेळ थांबावे. नियमित खार्‍या पाण्याने पिअर्सिंगची जागा स्वच्छ करायला हवी. तुम्हाला पोहण्याचा छंद असेल तर, पिअर्सिंगनंतर कमीत कमी एका आठवड्यापर्यंत स्वीमिंग करू नये. दागिना जर पिअर्सिंगच्या जागी चिकटला असेल आणि सहज गोलाकार फिरवता येत नसेल तर दागिना काढून टाकावा. काही दिवसांनी पुन्हा दागिना घालू शकता