महाड, रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर मुले व मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा संघाचे प्रतिनिधित्व करताना सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदक, १ रौप्यपदक आणि १ कांस्य पदक अशा एकूण ६ पदकांची कमाई केली.
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली.
अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे.
महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, आबासाहेब वीर, आर.डी.पाटील, बाळासाहेब देसाई व इतर धुरिणांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
वसंत सुर्यवंशी याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा 14 वर्षांपूर्वी दाखल झाला होता. त्यावेळी त्याला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.
टँकर बंद पडल्याने खाली उतरून स्टार्टर मारत असताना अचानक टँकर सुरू होवून चालकाच्या अंगावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता सातारा शहरालगत महामार्गावरील लिंबखिंड येथे झाला.
ही घटना 2016 मध्ये घडलेली आहे. आरोपी संदीप देशमुख याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवले. त्याद्वारे वेळोवेळी अत्याचार केले.
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक मोठी गर्दी झाली होती.
सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकलने अचानक पेट घेतला.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.