maharashtra

14 वर्षांपासून वॉन्टेड आरोपीला अटक

सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची करावाई

Wanted accused arrested for 14 years
वसंत सुर्यवंशी याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा 14 वर्षांपूर्वी दाखल झाला होता. त्यावेळी त्याला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.

सातारा : खुनाचा प्रयत्न आणि हत्यार जवळ बाळगणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात 14 वर्षांपासून वॉन्टेड असणार्‍या संशयित आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डीबी) अटक केली. वसंत निवृत्ती सुर्यवंशी (वय 52, रा. हेळगाव, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, वसंत सुर्यवंशी याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा 14 वर्षांपूर्वी दाखल झाला होता. त्यावेळी त्याला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.
त्यानंतर मात्र, तो न्यायालयीन  कामकाजाकामी हजर होत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याचे अटक वॉरंन्ट काढले होते. तरी देखील तो न्यायालयात हजर राहात नव्हता.  न्यायालयाने संशयिताची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. तरीही तो पोलिसांना गुंगारा देत होता. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला वसंत सुर्यवंशी हा त्याच्या गावी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. पोनि भगवान निंबाळक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलिस हवालदार अविनाश पवार, संजय दिघे, सुजित भोसले, सागर गायकवाड, विक्रम माने यांनी ही कारवाइ केली.