maharashtra

अंगावरून चाक गेल्याने चालक जागीच ठार


The driver died on the spot when the wheel went off his body
टँकर बंद पडल्याने खाली उतरून स्टार्टर मारत असताना अचानक टँकर सुरू होवून चालकाच्या अंगावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता सातारा शहरालगत महामार्गावरील लिंबखिंड येथे झाला.

सातारा : टँकर बंद पडल्याने खाली उतरून स्टार्टर मारत असताना अचानक टँकर सुरू होवून चालकाच्या अंगावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता सातारा शहरालगत महामार्गावरील लिंबखिंड येथे झाला. दरम्यान, टँकरचा स्टार्टर जिवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. बाबासाहेब महादेव औचर (वय 45, रा. सांगवी धुमळा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाबासाहेब औचर हे टँकरवर चालक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी टँकर घेऊन सातार्‍याकडे येत होते. त्यावेळी लिंबखिंड जवळील महामार्गावर अचानक टँकर बंद पडला. त्यामुळे चालक औचर हे खाली उतरले. चाकाखाली शिरून ते स्टार्टर मारत होते. त्यावेळी अचानक टँकर सुरू झाला आणि क्षणात त्यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्य झाला. याअपघातानंतर टँकर दुभाजकाला धडकून थांबला. या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.