येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाका येथील सिग्नलपासून गजानन हौसिंग सोसायटी आणि कृष्णा कॅनॉलपासून वेणूताई चव्हाण महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.
राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थामधुन विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा निलम येडगे व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
साताऱ्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रांसमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टी करण्यासाठी गेला होता. आज सकाळी काही जणांना तो यवतेश्वरच्या दरीत पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन त्याला 200 फुट खोल दरीतून जीवंत बाहेर काढले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यावर कोणताही तोडगा होत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बुधवारी सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे पंचवीस मिनिटे झालेल्या रास्ता रोको नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याच्या घटना घडल्या आहेत.
सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
सातारा आगाराची परिवहन सेवा संप सुरू असतानाही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सोमवारी आगाराचे 532 कर्मचारी हजर झाल्याची माहिती असून बारा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
सातारा जिल्ह्यातून तब्बल 22 दिवसानंतर पहिली लालपरी आज मंगळवारी दि. 30 रोजी पोलीस बंदोबस्तात स्वारगेटकडे रवाना झाली. शिवशाही बस नंतर लालपरी बस आता सातारा- स्वारगेट सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याच बरोबर सातारा- सातारारोड ही बस सुद्धा ग्रामीण भागात पहिली बस सुरू करण्यात असून 14 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली.