maharashtra

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी केले विषारी औषध प्राशन


In different cases, both of them administered poisonous drugs
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याच्या घटना घडल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋषिकेश शंकर फाळके, वय 29, रा, वडुथ, ता. सातारा याने राहत्या घरी गोचडी मारण्याचे औषध प्राशन केल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसर्‍या घटनेत पंकज आनंदा कदम, वय 20, रा. जांबेकरवाडी, ता. पाटण याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.