maharashtra

यवतेश्वर च्या दरीत पडलेल्या व्यापाऱ्याला जीवदान

शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना यश

Save the life of a trader who fell in the valley of Yavateshwar
साताऱ्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रांसमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टी करण्यासाठी गेला होता. आज सकाळी काही जणांना तो यवतेश्वरच्या दरीत पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन त्याला 200 फुट खोल दरीतून जीवंत बाहेर काढले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सातारा : साताऱ्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रांसमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टी करण्यासाठी गेला होता. आज सकाळी काही जणांना तो यवतेश्वरच्या दरीत पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन त्याला 200 फुट खोल दरीतून जीवंत बाहेर काढले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सुशांत बोराटे हा युवक मंगळवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरीत पडला होता. तो दरीत पडल्याचे कोणाला कळलेच नव्हते. आज सकाळी माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला दुचाकी पडलेली दिसली. त्यावरून त्यांना संशय आला. त्यांनी दरीच्या दिशेने डोकावून पाहिलं असता युवकाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. दरीत कोणीतरी पडलं असून ते जिवंत असल्याचं या नागरिकांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच आमदार शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला फोन केला. काहीच वेळात ही टीम या ठिकाणी दाखल झाली आणि काही कार्यकर्ते दरीत उतरले. त्यांनी सुशांतला सुखरूप दरीतून बाहेर पडले. १५ तासांहून अधिक तास सुशांत दरीत असल्यामुळं त्यांची प्रकृती खालावली होती. रेस्क्यू टीमने त्याला लगेचच शासकीय रुग्णालयात दाखल केलं. हा तरुण दरीत कसा पडला, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याला वेळीच मदत केल्याबद्दल शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे.
काही लोकांचे फोन आल्यानंतर सर्व टीमला घेऊन आम्ही घटनास्थळी पोहोचलो, सुमारे ३५० फूट खोल दरीत उतरून या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेलं हे रेस्क्यू ऑपरेशन साडेतीन वाजेपर्यंत सुरू होतं. आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की त्याच्या डोक्यास मार लागला आहे आणि त्याच्या मांडीचं हाड सुद्धा तुटलेलं आहे. आम्ही त्याचं नाव-गाव विचारून त्याला लगेच रुग्णालयात नेलं, असं रेस्क्यू टीमचे सदस्य चंद्रसेन जाधव यांनी सांगितलं.
याबाबत सुशांत बोराटे याने पोलिसांना अशी माहिती दिली आहे की, आम्ही मित्र पार्टी करण्यास गेलो. पार्टी केली, जेवलो. त्यानंतर आमच्यामध्ये वाद झाला. अन् त्यातील काहींनी ढकलून दिले असे तो सांगत आहे. तर त्याची दुचाकी ही घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आली. त्यामुळे तो स्वतः दारु पिऊन पडला की त्याला त्याच्या मित्रांनी ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत.