Phaltan

esahas.com

कोविड स्मशानभूमीच्या शेजारील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

कोरोना सारख्या महाभयंकर वैश्‍विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्‍वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत आहेत व त्या ठिकाणी दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोज मृत्यूच्या तांडव बघत असल्यामुळे स्मश

esahas.com

फलटणमध्ये ना. रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे. 

esahas.com

‘सोना अलाईज’ कंपनीतर्फे 21 टन ऑक्सिजनची निर्मिती

‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.

esahas.com

मलटण येथे 50 बेडचे कोविड सेंटर; नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकार

फलटण तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मलटण परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकारातून व श्री कृपा सिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ, मलटण यांच्या माध्यमातून येथील स्वामी समर्थ मंदिर येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

esahas.com

जोडप्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या योगेश मदनेच्या टोळीला मोक्का

सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्‍या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

esahas.com

दिगंबर आगवणे जमीन विकून उभारताहेत 100 ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक

esahas.com

वडजल येथे जुगार अड्डयावर छापा

वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

esahas.com

विनापरवाना गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्र. (एमएच 11 सीजी 4840) मधून प्रतिबंधित असलेले अन्न पदार्थ (विमल नावाचा गुटखा) एकूण किंमत रुपये 1,95,000 सह विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ व गाडी असे मिळून 4,95,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com

फलटण ग्रामीण रुग्णालयाचा गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका जेष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापुर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

esahas.com

‘सजाई गार्डन मंगल कार्यालया’त साकारतेय शंभर बेड्सचे कोरोना केअर सेंटर

सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटणमध्ये असणार्‍या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने 100 बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्त