येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी औंध गावातील केदारेश्वर चौकालगत असणारा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा बंधारा हटविण्यासाठी बेमुदत उपोषण मागील दोन दिवसांपासून येथील मारुती मंदिरात सुरू केले आहे. जगदाळे यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांनीही चक्रिय उपोषण सुरू केले आहे.
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 156 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 81 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
राज्यात विविध कारणांनी सातत्याने प्रकाशझोतात येत असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सन 2019-20 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाला असून, त्याचे शासकीय लेखापरीक्षण करावे, त्याचबरोबर सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र-समाज भूषण संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश येवले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
‘आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांमुळे शेतीमध्ये अनंत अडचणी येत असतात. शेतकरी आर्थिक सक्षम राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय असून, त्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी,’ असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना मनोहर गायकवाड यांची तर उपसरपंचपदी रामचंद्र बाळासाहेब घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नरसिंह ग्रामविकास पॅनेलने बहुमत प्राप्त केले आहे. निवडीनंतर सरपंच गायकवाड, उपसरपंच घोलप तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा रणजित भैय्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
‘सातारा जिल्ह्यातील तारळे येथील कवी यशवंत हे थोर कवी होते. त्यांच्या लेखनामध्ये विविधता होती. त्यांनी विपुल प्रमाणात आणि दीर्घ लेखन केले. त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांच्या लेखनामध्ये कमालीची विविधता होती. कथा, कविता, जातपत कविता, विडंबन कविता, बालकविता, प्रासंगिक, कथात्मक, अनुवाद, व्यासपीठ कविता असे त्यांच्या लेखनाचे वैविध्य होते. नवीन पिढीला त्यांच्या लेखनाबद्दल माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठच्या मराठी अधिविभागाचे प्रम
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 125 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 75 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.