मालखेड (नवे) ता. कराड तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी २९ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका घरातील ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने कर्त्यांनी लंपास केले आहेत.
एका महिलेने औषधाच्या अतिरिक्त गोळ्या खाल्ल्याची घटना सारखळ, ता. सातारा येथे घडली.
मायणी, ता. खटाव येथे एका महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : सातारा व कराड तालुक्यात मटका जुगार जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन टोळीतील सहाजणांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी हे आदेश दिले.सातारा शहर व तालुक्यात मटका अड्डा चालविणे, जबरी चोरी करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवे असणारी समीर सलीम कच्छी (वय ३९, रा. मोळाचा ओढा), अक्षय अनिल तळेकर (रा....
फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घालले आहेत.
सातारा जिल्ह्याला सह्याद्रीने वेढले आहे. याबाबत प्रत्येकाचा उर भरुन येतो. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात. आपल्या तालुक्याला जल, जमीन आणि जंगल ही त्रिवेणी संगम असणारी पर्वणी लाभली आहे. हा त्रिवेणी संगम आपल्याला ऊर्जा देऊन जातो.
उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना घेण्यात आलेले आहे. कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते व पुरातत्व विभाग आपली मालमत्ता कधीही कोणालाही हस्तांतरीत करीत नाही. असे असताना सातारा जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन संग्रहालयाचे रूपांतर जम्बो कोविड सेंटर मध्ये केले व नंतर मेडिकल कॉलेजमध्ये केले.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत.