कराड येथील बुधवार पेठ, नगरपालिका चौक परिसरात बेकायदा व बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह बाळगणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
सदाशिवगड, वनवासमाची ता. कराड येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी ७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
आसू, ता. फलटण परिसरातील मळशी नावाच्या शिवारातील म्हैस चोरल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकास अटक करून सुमारे 3 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.
फलटण तालुक्याचे दिगंबर आगवणे यांच्याकडून पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात म्हणून अंदाजे वीस हजार हजार लोकांना किराणा वाटप करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगणं महत्वाचेच आहे, परंतु त्यांचे विचार स्वतःत रुजवणं हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतःत जर आपण व्यवस्थितपणे रुजवू शकलो तरच प्रबोधनाची, परिवर्तनाची चळवळ गतिमान होणार आहे, असे महत्वपूर्ण विचार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.
वर्धनगड घाटातील रामोशी वाडी कडून दोन नंबर पुलाचे काम गेली चार महिने पूर्ण होऊन देखील त्या पुलाच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूने काढून दिलेला रस्ता पूर्णपणे खडतर झाला असून आणि चढ उताराचा असल्याने या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मोठी ताकद लागत असल्याने त्या रस्त्यावरच बंद पडतात!
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत.