तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी आम्ही आज काही पर्याय सांगणार आहोत.
शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्व आवश्यक आहे. ज्यामुळे तज्ज्ञ देखील आपल्याला हेल्दी फूड खाण्याचा सल्ला देतात. परंतु या सगळ्यात शरीरासाठी जास्त गरजेचं आहे. ते म्हणजे व्हिटॅमिन डी. कारण, व्हिटॅमिन-डी तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही खूप महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही अनेकदा पोट फुगण्याची तक्रार करत असाल, तर तुम्ही ताबडतोब तुमच्या जेवणातून काही गोष्टी काढून टाका. ज्यामुळे ही तक्रार उद्भवणं कमी होईल.
असे अनेक लोक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे अंड्याचे सेवन करतात, परंतु तुम्हाला माहितीय का की, अंड हे सगळ्याच गोष्टींसोबत खाऊ नये. 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे', हे तर तुम्ही ऐकलंच असेल. असं म्हणण्यामागे कारण आहे. अंड्याचे आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदे. यामुळेच डॉक्टर देखील आपल्याला अंड खाण्याचा सल्ला देतात. प्रथिनेयुक्त अंडी केवळ आपले स्नायूच मजबूत करत नाहीत ,तर हृदयाच्या कार्यास देखील मदत करतात. अंडी ही नाश्त्यात खाण्याची उत्तम गोष्ट आहे. ज्यामुळे तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा त्यापासून ऑम्लेट बनवू शकता.
डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. हृदयविकारसारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.
नारळाचे पाणी, नारळाचे तेल आणि किसलेले नारळ याचे अनेक फायदे आहेत नारळ हे असे सुपरफूड आहे, ज्याचा वापर पूजेपासून ते जेवणापर्यंत वापरले केला जातो. एवढंच काय तर याच्यापासून गोड पदार्थ बनवतात. नारळच नाही तर त्याच्या झाडं आणि झावळ्यांचा ही वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. म्हणजे तसा विचार केला तर नारळाचा किंवा त्याच्या झाडाचा असा कोणताही भाग नाही, ज्याचा आपल्याला उपयोग होत नाही. नारळाला आयुर्वेदात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
व्यायाम करताना होणाऱ्या चुकांमुळे तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. सध्याच्या धावपळीच्या जगात फीट राहणं खूप गरजेचं आहे. मात्र यासाठी प्रत्येकाकडे व्यायामासाठी तसंच जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ असेलच असं नाही. त्यामुळे अशा बऱ्याच व्यक्ती आहे जे ट्रेनरशिवाय घरी व्यायाम करतात. कदाचित तुम्हीही असं करत असाल. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही असं करत असताना तुमच्याकडून काही चुका होत आहेत. अशा चुकांमुळे तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होतं.
डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती. डोकेदुखीची समस्या आपल्यापैकी सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी येतेच. तर काही लोकांना नेहमीच हा त्रास उद्भवतो. परंतु हा मागील कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, डोकेदुखी ही एकाच प्रकारची असते. परंतु तसे नाही. अहवालानुसार, डोकेदुखीचे 150 प्रकार आहेत. ज्यांना आपण 4 भागांमधून समजू घेऊ, ज्यामुळे आपल्याला हे समजणं सोप्पं जाईल.
लहान वयात हाताचा थरकाप होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हात थरथरण्याचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. सामान्यतः वृद्धापकाळात ही समस्या अधिक बळावू शकते. अनेक कारणांमुळे ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. पार्किन्सन्स आजारातही हात थरथण्याची होण्याची समस्या उद्भवू शकते. लहान वयात हाताचा थरकाप होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये.