दहिवडी ः उच्च न्यायालयाच्या निकालानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रियेस निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विजया बाबर यांची नियुक्ती करण्यात आली असून बाजार समितीसाठी 7 ऑगस्टला मतदान व 8 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम ...
टेंभू योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता माण तालुक्यातील 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ताकदीनिशी आपल्याला लढा उभारायचा आहे. जोपर्यंत शेतीला पाणी मिळून शेती सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. - अनिल देसाई, (संचालक , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक)
कोरोनाकाळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथीत गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटसाठी दोन कोटीसह अन्य विकासासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ...
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली जादू कायम ठेवत पुन्हा एकहाती सत्ता मिळविली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या 292 जागांपैकी 216 जागा मिळाल्या असून निर्विवाद बहुमत मिळाले आहे.
इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिल्हा परिषद सदस्य रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
कराड ः राजकीय द्वेषातून सत्ताधार्यांकडून नगराध्यक्ष व भाजपाचे 4 नगरसेवक यांच्या वार्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्ताधार्यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. जनशक्ती व लोकशाही ...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू. सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा. माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊनचे आहे. मी एक किंवा दोन महिन्यांचा लॉकडाउन म्हणत नाहीये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'चर्चेतून कडक निर्बंध आणि सूट असा विषय सम...
कोविडसाठी नव्हे मिरवण्यासाठीच कराडच्या नगराध्यक्षा ग्राऊंड लेव्हल काम करत असल्याचे सांगत आहे. मात्र त्या ग्राऊंडवर नव्हे तर मिरवण्यासाठीच काम करतात. कोणी वारले असले तरी त्या ठिकाणी भेट दिली की, त्याचे फोटो काढता हे मिरवणे नाही तर काय, त्याचप्रमाणे कोविडसाठी आपण फिरला असे म्हणता तर कोविडसाठी फिरणे नव्हते तर निव्वळ मिरवण्यासाठीच फिरत होतात, तेही वारंवार आम्ही सिद्ध केले आहे.- सौ. स्मिता हुलवान
मुंबई: पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या या पदावर राहणे योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आह...
म्हसवड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ठराव घेतल्यानंतर पानवण ता. माण येथील डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी सायंकाळी रात्री दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. यानंतर त्यांच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली होती. या अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. मात्र रविवारी रात्री दहाच्या सुमारास पंढरपूर नजीक असलेल्या तांदूळवाडी येथील पेट्रोल पंपानजीक डॉ. शिंदे यांची अपहरणक...