म्हसवड : अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माण तालुक्यातील पानवन येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संबंधित डॉक्टरांचा ठराव झाल्यानंतर घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ...
ग्रामस्थांनी दिलेल्या संधीचा बेलवडे बुद्रुक गावाच्या हितासाठी उपयोग करून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावून गावाचा सार्वगीण विकास करणार आहे. - डॉ.सुशांत मोहिते
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुध्दा अन्य सहका-यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.
राज्यात नुकत्याच विधान परिषदा व ग्रामपंचायतींच्या निर्विघ्न पार पडलेल्या निवडणुका व सहकारी संस्थांमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी विनंती याचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
वारंवार मागणी करूनही या समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणून या वाँर्ड मधील महिला व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पुरोगामी विचारांचा नेता म्हणून उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख होती. सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्...
सोनीया गांधी यांच्या घरी जवळपास 5 तास चालेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवन बंसल म्हणाले, पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या वेळी बैठकीला संबोधीत केले.
कराड ः दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी खासदार अमर साबळे यांनी केला. येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदे...
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अधिवेशन बोलवू नये, असे सर्वसाधारण मत पुढे आले होते. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, 'कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेऊ...
नगर: गेल्यावेळी लोकसभा निवडणूक न लढविता 'लाव रे तो व्हिडिओ' सभा गाजविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. राज्यातील सर्व म्हणजे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्य...