म्हसवड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ठराव घेतल्यानंतर पानवण ता. माण येथील डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी सायंकाळी रात्री दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. यानंतर त्यांच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली होती. या अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. मात्र रविवारी रात्री दहाच्या सुमारास पंढरपूर नजीक असलेल्या तांदूळवाडी येथील पेट्रोल पंपानजीक डॉ. शिंदे यांची अपहरणकर्त्यांनी सुटका केली असल्याची माहिती समोर येत असून डॉ. शिंदे यांच्या अपहरणबाबतचा तपास पोलिस करत आहेत.