organizingvariousactivitiesunderruralagriculturalawarenessandagroindustrial

esahas.com

डंगिरेवाडीत ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर घनवट यांनी माण तालुक्यात डंगिरेवाडी (मोही) या गावामध्ये शेतकर्‍यांना विविध पिकासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विविध इंटरनेट अ‍ॅपच्या माध्यमातून पिकावरील रोग किडी कशा ओळखाव्यात याची माहिती दिली.