त्वचेवरचा रंग काढून टाकण्यासाठी लोक त्वचा स्क्रब करणं सुरू करतात. पण असं कधीच करू नये असं केल्यानं त्वचेचा रंग जाईल पण नुकसानही पोहोचू शकतं.
खेळून झाल्यानंतर त्वचा, केस आणि नखांमध्ये अडकलेला रंग काढून टाकणं खूप कठीण काम असतं. काही लोकांच्या त्वचेवरचा रंग निघता निघत नाही. अशावेळी ते केमिकल्सयुक्त शॅम्पू किंवा इतर गोष्टी वापरून रंग काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्वचा आणि केसांचं खूप नुकसान होऊ शकतं. म्हणूनच या लेखात तुम्हाला होळी खेळल्यानंतर रंग काढून टाकण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
शरीरावर रंग कसा घालवायचा? (How to remove holi colour from body)
त्वचेवरचा रंग काढून टाकण्यासाठी लोक त्वचा स्क्रब करणं सुरू करतात. पण असं कधीच करू नये असं केल्यानं त्वचेचा रंग जाईल पण नुकसानही पोहोचू शकतं. चेहरा आणि त्वचेवरचा रंग काढून टाकण्यासाठी बॉडीवॉश किंवा साबणाचा वापर करायला हवा. सगळ्यात आधी त्या भागावर तेल लावावं जेणेकरून रंग लवकर निघेल. जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही क्रिम किंवा लोशनही वापरू शकता.
चेहऱ्यावरचा रंग कसा काढायचा (How to remove holi colour from face)
चेहऱ्यावरचा रंग काढून टाकण्यासाठी क्लिजिंग फेसवॉश नंतर मॉईश्चराईजरचा वापर करा. गरज पडल्यास तुम्ही फेस मास्कचा वापर करू शकता. होळी खेळण्याआधी तुम्ही त्वचेवर तेल लावत असाल तर टॅनिंग टाळण्यासाठी सनस्क्रीनही वापरू शकता. बेसन, दही आणि लिंबू यांचे मिश्रण यांसारखे घरगुती उपाय करत असाल तर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्यात व्हिटॅमीन ई ची कॅप्सूल्स मिसळा.
केसांवर रंग कसा काढायचा (How to remove holi colour from hairs)
केसांवरचा रंग काढून टाकण्यासाठी होळी खेळल्यानंतर लगेचच केस धुवा. कदाचित तुम्हाला २ वेळा शॅम्पूनं केस धुवावे लागू शकतात. केस धुताना आठवणीनं कंडिशनर लावा. कंडिशनरनंतर हेअर सिरम लावायला विसरू नका. उन्हाच्या प्रभावामुळे केसांचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
नखांवरचा रंग कसा काढायचा (How to remove holi colour from nails)
नखांवर रंग लागू नये म्हणून तुम्ही ट्रांसपेरेंट नेलपॉलिश लावू शकता. जी नेलपेंट रिमुव्हरने लगेच निघू शकते. त्यानंतरही नखांवरचा रंग निघत नसेल तर नखं कोमट पाण्यात बदामाचं तेल घालून व्हिनेगरसरह भिजवून ठेवा. यामुळे नखांवरचा रंग निघून जाईल. होळी खेळल्यानंतर त्वचेवर किंवा केसांवर खूप खाज येत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.