जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे राबवण्यात आला. यानिमित्ताने संघटनेच्या खटाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खटाव तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या भगिनींचा पुष्पगुच्छ, रोपे तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे सन्मानपत्र देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
तडवळे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणपत निवृत्ती खाडे-पाटील यांची तर उपसरपंचपदी संगीता भीमराव माळवे यांची बिनविरोध निवड झाली. त्रिशंकू संख्याबळाच्या परिस्थितीत नाट्यमय घडामोडी घडण्याबरोबर ‘पाटीलकी’ने आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सातेवाडी (ता. खटाव) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आण्णा शंकर कोळेकर यांच्या उसाच्या शेतीस शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 1 लाखाची वित्तहानी झाली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यांतील 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्निवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती निवृत्त आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
खटाव तालुक्यातील निढळ येथे जीवन ज्योती ग्राम संघ व जीवन साथी ग्राम संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी निढळमध्ये हा दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.
‘अंबवडे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस विचारानेच कार्यरत राहणार आहे,‘ अशी ग्वाही पॅनेलप्रमुख प्रकाशशेठ नलवडे यांनी दिली.
केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकर्यांच्या विरोधात आहेत. सदर कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीकरिता दिल्ली येथे दीर्घकाळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने खटाव तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले.