Khatav

esahas.com

वडूजमध्ये थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम

येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार  प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल भरण्यास प्रेरित करून थकीत ग्राहकांचे वीजबिल भरून घेण्यात येत आहे. तसेच थकीत वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे.

esahas.com

शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या अधिकार्‍यांचा निषेध

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर यांच्यासह शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरण अधिकार्‍यांची वागणूक उर्मट असून पदाधिकार्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला. जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार या शिवसैनिकांवरती जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून जनतेसाठी झटणार्‍या शिवसैनिकांना न्याय द्यावा,

esahas.com

मनोरे यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा

‘व्हॉलीबॉल व इतर खेळांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणार्‍या राष्ट्रीय खेळाडू जावेद बाशुमियाँ मनोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.

esahas.com

आईच्या स्मृती जपण्याचे काम नवीन पिढीला प्रेरणादायी

‘आई-वडील मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देत असतात. शिक्षणामुळे जीवनात गती प्राप्त होते. प्रतिकूल परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारित केलेल्या आईच्या स्मृती जपण्याचे मुलाणी कुटुंबाचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन औंधचे सपोनि उत्तमराव भापकर यांनी केले.

esahas.com

रणजितसिंह देशमुख यांच्यासारखे कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच

‘हजारो महिलांच्या हाताला कामे देऊन दुष्काळी पट्ट्यात रोजगार उपलब्ध करून देणार्‍या रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच आहे,’ असे मत ओरिसा राज्यातील उच्च न्यायालयातील वकील व ‘माँ घर फाउंडेशन’च्या संस्थापिका-अध्यक्षा अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती यांनी केले.

esahas.com

पुसेगावात शिवसैनिकांनी महावितरणच्या वसुली अधिकार्‍यांची गाडी फोडली

कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. सोमवारी (ता. 15) महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे वीजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. 

esahas.com

खटाव तालुक्यात रंगला खिलारी वासराचा नामकरण सोहळा

विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्यांनी या वासराचे बारसे गावातील श्री वाघेश्‍वरी व नवलाई देवी मंदिराच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन उत्साहात साजरे केले.

esahas.com

पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी निधी कमी पडू देणार आहे,’अशी ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.

esahas.com

सातारा जिल्हा मनसे सभासद नोंदणीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर मनसे सभासद नोंदणी होत आहे. सातारा जिल्हा मनसे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या गोंदवले ता माण येथील राजगड मनसे पक्ष कार्यालयात हजारोंच्या संख्येने तरुणांनी मनसेचे सभासदत्व घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात सभासद नोंदणी चा कार्यक्रम हा इतर राजकीय पक्षला प्रेरणादायी ठरणार आहे. 

esahas.com

सामाजिक बांधिलकीची भावना महत्त्वाची

‘सार्वजनिक जीवनात काम करताना सामाजिक बांधिलकीची भावना महत्त्वाची असते,’ असे ह. भ. प. जयवंत जौंजाळ यांनी व्यक्त केले.