Khatav

esahas.com

दरुजच्या सरपंचपदी नंदा खामकर तर उपसरपंचपदी रोहित लावंड यांची निवड

दरुज (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा किसनराव खामकर यांची तर उपसरपंचपदी रोहित चंद्रकांत लावंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. नंदा या वडूज वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. किसनराव खामकर यांच्या पत्नी आहेत. 

esahas.com

ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे 

‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

esahas.com

‘माणस्वदेश’तर्फे शेतकर्‍यांसाठी समुपदेशन कक्ष सुरू करणार

‘शेनवडी व परिसरातील सर्वच ठिकाणी माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना रेशीम शेतीकडे शाश्‍वत शेती म्हणून पाहावे. त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय संस्थेच्या माध्यमातून शेती, मार्केट, बी बियाणे, अवजारे यावर काम केलेच जाईल, पण याशिवाय येत्या काळात माती परीक्षण करून शेतीमधील मुख्य घटक ओळखून पिके घेण्यासाठी येत्या काळात जास्तीत जास्त काम केले जाईल. शिवाय शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी समुपदेशन कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. येत्या काळात मा

esahas.com

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करू नये 

येथील केदारेश्‍वर मंदिरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधार्‍याचा सुमारे 35 शेतकर्‍यांना लाभ होत आहे. त्यामुळे शासनाने बंधारा निर्लेखित करू नये, अशी मागणी जगन्नाथ उर्फ दाजी गायकवाड यांच्यासह शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

esahas.com

सातेवाडीच्या सरपंचपदी वृषाली रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब बोटे यांची निवड

सातेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली विक्रम रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब महादेव बोटे यांची बहुमताने निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत जानुबाई ग्रामविकास पॅनेलने 9 पैकी 6 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

esahas.com

उंबर्डेच्या सरपंचपदी सुनंदा पवार तर उपसरपंचपदी संभाजी पवार यांची निवड

उंबर्डे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा संजय पवार तर उपसरपंचपदी संभाजी शिवाजी पवार यांची बहुमताने निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीवेळी नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या. बहुमतातील आघाडीची दोन मते फुटल्याने अल्प मतातील आघाडी बहुमतात आली. 

esahas.com

दातेवाडी सरपंचपदी गौरी पवार तर उपसरपंचपदी रंजना जाधव यांची निवड

दातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नीलेश पवार तर उपसरपंचपदी रंजना काशिनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

esahas.com

सागर जगदाळेंचे दुसर्‍या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू

येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी औंध गावातील केदारेश्‍वर चौकालगत असणारा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा बंधारा हटविण्यासाठी बेमुदत  उपोषण मागील दोन दिवसांपासून येथील मारुती मंदिरात सुरू केले आहे. जगदाळे यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांनीही चक्रिय उपोषण सुरू केले आहे. 

esahas.com

खटाव तहसीलदार इन अ‍ॅक्शन; वाळू माफियांवर मोठ्या कारवाया 

खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍यावर स्वतः खटाव तहसीलदार आणि पथक यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या वाळू कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल तहसीलदार किरण जमदाडे यांनी ताब्यात घेतला आहे. तर स्वतः तहसीलदार हे कारवाईत सहभागी होत असल्याने आता अवैध वाळू वाहतुकीला आळा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

esahas.com

सूर्याचीवाडीच्या सरपंचपदी रंजना गायकवाड यांची निवड

सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना मनोहर गायकवाड यांची तर उपसरपंचपदी रामचंद्र बाळासाहेब घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नरसिंह ग्रामविकास पॅनेलने बहुमत प्राप्त केले आहे. निवडीनंतर सरपंच गायकवाड, उपसरपंच घोलप तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा रणजित भैय्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.