डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
स्टेट बँकेतील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी येणार्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने खळळ्खट्याक् दाखवून देऊ, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबत सोमवारी मनसेच्या पदाधिकार्यांनी वडूज शाखा व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले.
खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निमसोड (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
‘संत नामदेवांपासून नारायण सुर्वेंपर्यंत समृद्ध साहित्य परंपरा असणारी मराठी अभिजात दर्जाला पात्र आहे. श्रमिक वंचित कष्टकर्यांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले आहे. हे आपल्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण होय,’ असे प्रतिपादन कवयित्री कुंदा लोखंडे-कांबळे यांनी केले.
मांडवे (ता. खटाव) येथील उपसरपंच पदाची निवड अतिशय चुरशीने झाली. या निवडीत प्रस्थापित नेतृत्वाला शह देत गावचे युवा नेते व सातारा जि. प. चे चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गावामध्ये ‘नवीन युवा पर्वा’चा उदय केला आहे.
खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या. यात अनेक युवा वर्गाची राजकारणात झालेली एन्ट्री गावच्या विकासाला पारंपरिक चाकोरीमधून आधुनिक विकासाच्या परिवर्तनाकडे नेणारी ठरणार आहे. याप्रमाणेच अनफळे (ता. खटाव) या दुर्लक्षित असणार्या छोट्याशा गावाच्या विकासासाठी गावातील सुपुत्र स्वप्नील कांबळे यांनी पत्रकारितेच्या प्रवाहातून थेट निवडणुकीत बिनविरोध होत राजकारणात एन्ट्री केली आहे.