Karad

esahas.com

साहेब... एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्या

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत संप आंदोलनांतर्गत गुरुवारी 25 रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी साकडे घालत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला सुद्बुध्दी देण्यासाठी प्रार्थना केली.

esahas.com

राज्यभरात आर्किटेक्ट भंडारी यांच्यावरील हल्ल्याचा आज काळ्या फिती लावून करणार निषेध

कराड येथे आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या कराड केंद्राकडून यापूर्वीच निषेध व्यक्त करुन लोकप्रतिनिधीना निवेदनही दिली आहेत. आता या घटनेची गंभीर दखल दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या महाराष्ट्र विभागाने घेतली असून उद्या गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी  राज्यभरातील आर्किटेक्टस दिवसभर काळी फीत बांधून या हल्ल्याचा निषेध करणार आहेत.  

esahas.com

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत आज डाॅ. प्रा. आनंद पाटील यांचे व्याख्यान

साहित्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत अन् साहित्याचा मानदंड असलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरपालिका नगरवाचनालयाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावर साहित्यातील अनेक संतांनी प्रबोधनाचा जागर मांडला होता. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा राजकारणाचा वसा आणि वारसा देशपातळीवर जपला जात असून त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असते.

esahas.com

कराडात रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राची सुरुवात

रुग्णालयातून रुग्ण घरी आल्यानंतरही काही रुग्णांना दीर्घकाळ ठराविक  साधनांची गरज भासते. ही साधने त्या काळात अत्यावश्यक असली, तरी काही काळानंतर त्या साधनांची रुग्णांना गरज भासत नाही. गरीब व गरजू कुटुंबातील रुग्ण अशी साधने कायमची विकत घेऊ शकत नाहीत.

esahas.com

कराडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा  विजय झाला. त्यांनी ८ मतांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. हा निकाल जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.

esahas.com

संपाच्या तेराव्या दिवशी सरकारचा घातला तेरावा

येथील बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. या संपचा आज तेरावा दिवस असून सरकारने अद्यापही मागणी मान्य न केल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन सरकारचा तेरावा घालला. तसेच सरकारच्या नावाने बोंब ठोकून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.

esahas.com

आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन पुन्हा कोणत्याही व्यावसायिकासोबत अशा घटना घडू नयेत, त्यादृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या कराड उपकेंद्राच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

esahas.com

आर्किटेक्ट मारहाणप्रकरणी सातजणांना अटक व जामीन

वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही.

esahas.com

भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला

पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

esahas.com

आर्किटेक्टसह दोघांना मारहाण केल्याप्रकरणी पं.स. सदस्यासह सुमारे दहा जणांवर गुन्हा

आर्थिक कारणावरुन आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचायत समिती नामदेव पाटील यांच्यासह सुमारे दहा जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी रा. कोयना कॉलनी, शनिवार पेठ, कराड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.