अतीत (ता.सातारा) येथे जागेच्या कारणावरून दोन कुटुंबात भांडणे होऊन बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून गर्दी मारामारी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली बायको असताना दुसरे लग्न का केले यातून झालेल्या वादातून पिंप्रद (ता. फलटण) येथे वडिलांनी मुलाचा कुर्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.
जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा लोकं माणसाला मारून खातील, असं ऐकीवात होतं. या म्हणीला तंतोतंत खरे ठरावे याची प्रचिती फलटणकरांना बघावयास मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृतदेहाचे लचके तोडून आपली भूक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर शहारे आणणार्या या घटनेला पाहून मन सुन्न होत आहे.
येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहे. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.
जमिनीचा सात-बारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मसूर सजाचा तलाठी व अन्य एकास अँटीकरप्शनने अटक केली आहे. तलाठी निलेश सुरेश प्रभुणे वय 45, रा. मलकापूर, संगमनगर, ता. कराड आणि रविकिरण अशोक वाघमारे वय 27 रा. मसूर ता. कराड अशी त्यांची नावे आहेत.
माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
शिक्षक म्हणजे ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव आहे. या उदात्त हेतूने प्रत्येक शिक्षकाला दैवत मानून भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दहिवडी नं. 1 शाळेचे उपक्रमशील शिक्षक सागर जाधव यांचा प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
येथील बबनराव सरतापे हे सर्वसामान्य पानपट्टी चालक आहेत. व्यवसायाबरोबर ते मनापासून हनुमानाची उपासनाही करतात. दरवर्षी ते हनुमान जयंतीदिवशी अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, गोरगरिबांना मदत करत असतात.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.
कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.