वडोली-निळेश्वर ता. कराड येथे चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मंगळवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ग्रामस्थांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यामध्ये प्रितमकुमार शामराव पवार यांच्या घरातून २ लाख २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे
तालुक्यातील खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात ऊसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली चालणार्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 77 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जुगार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जनार्दन आनंदराव चव्हाण (वय 72, रा. राधिका रोड, सातारा) यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीसी 7741 ही एसटी स्टॅन्डमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने ही दुचाकी चोरून नेली.
पतीचे काम सुटल्याने घर खर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहिता प्रियांका कुंडलिक सोळवंडे (वय 33, रा. करंजे पेठ, सातारा) यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
राजवाड्यावर प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी युवकांनी रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड मारून त्यांची रिक्षा पळविल्याची घटना सातारा तालुक्यातील सैदापूर येथे दि. 8 रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.
हॉटेल चालकाशी हुज्जत घालत असताना त्यामध्ये पडलेल्या ग्राहकावर दोघांनी फरशी डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.
चारचाकी वाहनातून स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा अँटी टेररिस्ट सेलच्या (एटीसी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे येथे एक सुमो संशयास्पदरीत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थांबवली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा होता.
दि. ८ नोव्हेंबर रोजी आटाळी गावच्या हद्दीत आकाश बाचल यांच्या जमिनी मध्ये विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता अतित, ता. सातारा येथील बाळासाहेब लोहार या लाकूड व्यापाऱ्याकडून बेकायदेशीर विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आकाश बाचल आणि बाळासाहेब लोहार या दोघांवर वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या औषधाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दुसरीकडे, कंपनीने नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्याने दोन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे.
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.