maharashtra

युवतीच्या अपहरणप्रकरणी चार जणांवर गुन्हा


Four persons have been booked in connection with the abduction of a young girl
युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, प्रवीण बजरंग बावळेकर, प्रवीणची आई (पूर्ण नाव माहित नाही), त्याचे वडील बजरंग सर्व रा. मेतगुताड ता. महाबळेश्वर व सुनिता गावडे वय ३५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
चार सप्टेंबरला प्रवीण व सुनिता यांनी जबरदस्तीने ओमनी गाडीतून युवतीचे अपहरण केले. प्रवीण याने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले, तसेच त्याच्या आई-वडीलांनी जातीच्या कारणावरून अनेकदा हिणवले, असे संबंधीत युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल या करत आहेत.