महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, आबासाहेब वीर, आर.डी.पाटील, बाळासाहेब देसाई व इतर धुरिणांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
वसंत सुर्यवंशी याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा 14 वर्षांपूर्वी दाखल झाला होता. त्यावेळी त्याला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.
टँकर बंद पडल्याने खाली उतरून स्टार्टर मारत असताना अचानक टँकर सुरू होवून चालकाच्या अंगावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता सातारा शहरालगत महामार्गावरील लिंबखिंड येथे झाला.
ही घटना 2016 मध्ये घडलेली आहे. आरोपी संदीप देशमुख याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवले. त्याद्वारे वेळोवेळी अत्याचार केले.
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक मोठी गर्दी झाली होती.
सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकलने अचानक पेट घेतला.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर चालू वर्षाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंद करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे.