महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सदरबझार मधील दुचाकीची चोरी

सदरबझार मधील सैनिक नगरातील बंद घर फोडत चोरट्यांनी घरात असणाऱ्या चावीच्‍या मदतीने बंगल्‍याच्‍या आवारात असणारी २० हजार रुपयांची दुचाकी चोरुन नेली. बंगल्‍याच्‍या आवारातील दुचाकी चोरत असतानाच त्‍याठिकाणी दुसरी दुचाकी चोरट्यांनी ठेवत पळ काढला.

esahas.com
महाराष्ट्र

भीषण अपघातात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; चिमुरडी बचावली

दहिवडी बिदाल रस्त्यावर शेरेवाडी ओढ्यावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गोंदवले येथील बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. इस्टीम कारने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चिमुरडी बचावली.

esahas.com
महाराष्ट्र

१० डिसेंबर पासून जिल्हा परिषद मैदानावर होणार ज्योतिर्मय महोत्सव 2021

शाहूनगरवासियांसाठी १० ते १४ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्योतिर्मय फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

'सह्याद्रि'च्या पोलिस कर्मचारी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० पेक्षा जास्त जणांची तपासणी

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 12 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्‍यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

esahas.com
महाराष्ट्र

मनसेच्या सातारा जिल्हा संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार सेना राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरुन आलेल्या विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार होते.

esahas.com
महाराष्ट्र

'त्या' दोन परदेशी नागरिकांना चार दिवसांची पोलीस कोठडी

मलकापूर, ता. कराड येथे  बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार्‍या परदेशी दोन नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली होती.  सदर दोघेही रोमानियाचे नागरिक असून त्यांना सोमवारी 6 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

'चौसिंगा'च्या शिकार प्रकरणी २ आरोपींना अटक

कण्हेर विभागातील जांभळेवाडी येथे चौसिंगा जातीच्या वन्यप्राण्याची शिकार होत असल्याची गोपनीय माहीती मिळताच सातारा वनविभागाने छापा टाकुन दोन आरोपींना मुद्देमाला सोबत ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

28 जणांची फसवणूक करणार्‍या भामट्याविरोधात गुन्हा

कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देतो, असे सांगून सातारा व सांगली जिल्ह्यातील 28 जणांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात मकरंद वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सैनिक स्कूलमधील चंदनाचे झाड चोरीस

येथील सैनिक स्कूलमधील सात फूट चंदनाचे झाड अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवार, दि. 5 रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत विरेश कुमार वय 45, रा. सैनिक स्कूल, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला नागरिकांनी घाबरु नये

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला घाबरुन न जाता नागरिकांनी कोरोना संदर्भात शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.