deshvidesh

दुचाकी टोलदुचाकी टोल : देशभरातील टू व्हिलरलाही टोल लागणार? नितीन गडकरींनी सांगितले सत्य!


Two Wheeler Toll: Will two wheelers across the country also have to pay toll? Nitin Gadkari told the truth!
दुचाकी टोलदुचाकी टोल India 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुचाकी स्वारांकडून कोणत्याही प्रकारचा टोल घेणार नाहीय.

Two-wheeler toll India 2025: चारचाकी वाहनांसाठी वार्षिक पासचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केला. यामुळे चारचाकी वाहनचालकांना दिलासा मिळाला. दरम्यान या निर्णयाला महिनाही पूर्ण झाला नसताना दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरही कर भरावा लागेल, असे वृत्त समोर आले होते.  हा नियम १५ जुलैपासून लागू होईल, असे सांगण्यात आले. पण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्या वेळी टोल कर वसूल केला जातो. असे असताना दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नाही. राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जातो.पण नवीन नियमानुसार दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागेल. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला 2 हजार रुपये दंड भरावा लागेल, असे व्हायरल होणाऱ्या वृत्तात म्हटले होते. NHAI च्या टोल माहिती प्रणालीच्या नोंदीनुसार, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशात एकूण 1057 NHAI टोल आहेत. त्यापैकी सुमारे 78 टोल आंध्र प्रदेशातच आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 33 टोल आहेत तर उत्तर प्रदेशात 123 टोल प्लाझा आहेत. दरम्यान नितीन गडकरींनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले गडकरी?

टू व्हिलर चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, असे नितीन गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

15 ऑगस्टपासून 3 हजार रुपयांचा पास

आता FASTag शी जोडलेला एक नवीन वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. हा वार्षिक पास राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी असून 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.टोल प्लाझावरील त्रास कमी करणे हा या वार्षिक पासचा उद्देश आहे. विशेषतः टोल प्लाझापासून 60 किमीच्या आत राहणाऱ्यांना याचा फायदा होईल. अनेकदा टोल प्लाझाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही टोल भरावा लागतो. पण या पासमुळे त्यांना दिलासा मिळेल. आता जे लोक विशिष्ट टोल प्लाझावरून वारंवार जातात त्यांना पत्ता पुरावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून मासिक पास मिळू शकतो.या पासमुळे टोल प्लाझावरील गर्दी कमी होईल. टोलवरून होणारे भांडणही कमी होतील. खासगी वाहने महामार्गावर जलद धावू शकतील. सरकारला सर्वकाही डिजिटल करायचे आहे. यामुळे लोकांची सोय होणार आहे. यासोबत रस्तेही आधुनिक होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग ग्रिडवरील वाहनचालकांच्या सोयीसाठी पास आणला जातोय.

टोलमधून किती उत्पन्न मिळणार?

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये एकूण 55 हजार कोटी रुपयांच्या टोल महसुलापैकी खासगी कारचा वाटा फक्त 8 हजार कोटी रुपये होता. टोल प्लाझावरील वाहतुकीत खासगी गाड्यांचा वाटा 53% असतो पण महसूलात त्यांचा वाटा फक्त 21% असतो. शिवाय सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत खासगी वाहनांचा वाटा जवळजवळ 60% असतो. तर व्यावसायिक वाहने दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत धावतात, असे टोल व्यवहारांच्या विश्लेषणातून दिसून येते. पासची किंमत किती?या पासची किंमत दरमहा 340 रुपये आहे. जी वार्षिक 3000 रुपये होते. असे असले तरी लहान-मोठ्या वाहनांप्रमाणे वेगळी असू शकते. हे विशेषतः खासगी गैर-व्यावसायिक वाहनांसाठी असेल. यात जीप आणि व्हॅनचा समावेश आहे. हा पास सक्रिय झाल्यानंतर एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्यांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल) वैध असेल. वाहनचालक राष्ट्रीय महामार्ग अॅप आणि NHAI आणि MoRTH च्या अधिकृत पोर्टलवरील एका विशेष विभागाद्वारे त्यांचा पास अॅक्टीव्ह आणि अपडेट करू शकतील.