deshvidesh

ATM ते डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 1 जुलैपासून बदलणार बॅंकेचे नियम, काय होणार परिणाम?


Big news for ATM and debit card users; Bank rules will change from July 1, what will be the impact?
Banking Rule Change : बॅंकिंग मध्ये 1 जुलैपासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर

Banking Rule Change : पुढील 1 जुलैपासून खासगी क्षेत्रातील काही मोठ्या बँकांमध्ये नियमांमध्ये बदल होणार आहेत. ICICI आणि HDFC या दोन मोठ्या बँकांनी त्यांच्या सेवांवर शुल्क वाढवले आहेत. तुम्ही या दोन्ही बँकांचे ग्राहक असाल, तर तुमच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय बदल होणार आहेत. 

ATM ट्रांजेक्शनवर शुल्क

ICICI बँकेचे कस्टमर्स जर कोणत्या दुसऱ्या बॅंकेच्या ATM चा वापर करत असतील तर ते 3 फ्री ट्रांजेक्शननंतर फायनॅशियन ट्रान्झॅक्शनवर 23 रुपये नॉन-फाइनेंशियल ट्रांजेक्शन पर 8.5 रुपये द्यावे लागतील. आधी हे चार्ज 21 रुपये लागायचे. मेट्रो शहरांमध्ये विना शुल्क 3 ट्रान्झॅक्शन आणि छोट्या शहरांमध्ये 5 विना शुल्क ट्रान्झेक्शन मिळतील.

IMPS ट्रांजेक्‍शन

IMPS ट्रांजेक्‍शन सेवा तुम्ही ICICI बँकेतून IMPS द्वारे पैसे पाठवत असाल. तर तुम्हाला कशा प्रकारे शुल्क लागतील ते जाणून घेऊया. 1,000 रुपयांपर्यंतचं ट्रान्झेक्शन असेल तर तुम्हाला 2.50 रुपये प्रत्येक ट्रान्झेक्शनसाठी लागतील. 1000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1,00,000 रुपयांपर्यंत असेल तर प्रत्येक ट्रान्झेक्शन शुल्क लागू होईल. तर 1,00,000 रुपयांपासून आणि 5,00,000 रुपयांपर्यंत जर ट्रान्झेक्शन असेल तर शुल्क हे 15 रुपये प्रति ट्रान्झेक्शन असेल.

कॅश विड्रॉल (Cash Withdrawal)

दरमहिन्याला फक्त 3 मोफत कॅश विड्रॉल आहेत. त्यानंतर प्रत्येक वेळेस 150 शुल्क आकारण्यात येईल. जर एका महिन्यात 1 लाखांपेक्षा जास्त पैसे काढले, तर त्यावर 1,000 रुपयांमागे 3.5 रुपये किंवा 150 रुपयांपेक्षा लागू शकतात. 

डेबिट कार्ड शुल्क

सामान्य ग्राहकांसाठी वार्षिक शुल्क हे 300 रुपये असणार आहे. तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 150 रुपये. कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास नवीन कार्डासाठी 300 रुपये द्यावे लागणार. 

डिमांड ड्राफ्ट व पे ऑर्डरवर शुल्क

तुम्हाला कॅश डिपॉजिट, चेक डिपॉजिट, डिमांड ड्राफ्ट आणि पे ऑर्डर सारख्या सर्विसेसवर आता प्रत्येक 1,000 रुपयांमागे 2 शुल्क लागणार. तर प्रत्येत कमीत कमी 50 रुपये आणि जास्तीत जास्त 15,000 रुपये शुल्क आहे. 

HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

गेमिंग अ‍ॅप्सवर अर्थात Dream11, MPL सारख्या अॅप्सवर जर दरमहिन्याला 10,000 पेक्षा जास्त खर्च केला. तर, तुम्हाला त्यावर 1% अतिरिक्त शुल्क लागेल. महिन्याभरात हा चार्ज फक्त 4,999 रुपयांपर्यंत घेऊ शकतात. त्यासोबत ट्रान्झेक्शनवर कोणताही रिपॉर्ड पॉइंट देण्यात येत नाही. थर्ड पार्टी वॉलेट्स सारख्या पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज, ओला मनी) मध्ये जर तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपयांपेत्रा जास्त डिपॉजिट करत असाल तर त्यावर देखील 1% चार्ज लागेल आणि त्यात असलेली शुल्क सीमा ही 4,999 दर महिन्याला आहे.