शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट व एमआयडीसी येथील मोकळ्या जागेत उभे असलेले ट्रक आणि रोडरोलर मधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा : शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट व एमआयडीसी येथील मोकळ्या जागेत उभे असलेले ट्रक आणि रोडरोलर मधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट येथील मोकळ्या जागेत अनिकेत तपासे (वय 33, रा. मल्हारपेठ सातारा) यांच्या मालकीचा ट्रक (क्रं. एमएच 12 जीटी 4205) उभा होता. त्यामधून 10 हजार रूपये किंमतीच्या बॅटर्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत.
दुसर्या घटनेत एमआयडीसी येथील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या रोडरोलर मधून 15 हजार रूपये किंमतीच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. अधिक तपास अनुक्रमे महिला पोलीस नाईक सुतार व पोलीस नाईक भोंडवे करत आहेत.


