उसाने भरलेल्या बैलगाडीला आग
कृष्णा पुलावरील प्रकार : बैलगाडी चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
येथील कृष्णा पुलावर उसाने भरलेल्या बैलगाडीला अचानक आग लागली. ही बाब इतर वाहन चालकांनी बैलगाडी चालकाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर त्याने तात्काळ बैलांना बैलगाडीपासून वेगळे केल्याने अनर्थ टळला. बुधवार 16 रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने काही काळ पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
कराड : येथील कृष्णा पुलावर उसाने भरलेल्या बैलगाडीला अचानक आग लागली. ही बाब इतर वाहन चालकांनी बैलगाडी चालकाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर त्याने तात्काळ बैलांना बैलगाडीपासून वेगळे केल्याने अनर्थ टळला. बुधवार 16 रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने काही काळ पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी ऊसाने भरलेल्या बैलगाडीला कृष्णा पुलावरुन जात असताना चालत्या बैलगाडीतून धुर निघू लागला. ही बाब पुलावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांच्या निदर्शनास आली. त्यांनतर त्यांनी संबंधित बैलगाडी चालकास याबाबतची कल्पना दिली असता त्याने तात्काळ बैलगाडी थांबवत बैलांना बैलगाडीपासून वेगळे केले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.
दरम्यान, सुदैवाने त्याच वेळी पुलावरुन जाणार्या डंपरमधील टाकीत असलेल्या पाण्याने बैल गाडीला लागलेली आग विझविण्यात आली. तत्पूर्वी, या घटनेने काही काळ पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही बाब वाहतूक पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.


