साताऱ्यातील यशस्वी उद्योजिका सौ. वर्षा राजेश भोसले यांचा नुकताच लायन्स क्लबच्या नवदुर्गा पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
सातारा : साताऱ्यातील यशस्वी उद्योजिका सौ. वर्षा राजेश भोसले यांचा नुकताच लायन्स क्लबच्या नवदुर्गा पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
येथील लायन्स क्लब एम आय डी सी सातारा तर्फे नवरात्रीचे औचित्य साधून यशस्वी महिलांच्या कर्तुत्वाचा गौरव करण्याच्या हेतूने नवदुर्गा उद्योजिका पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले होते. साताऱ्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव फक्त महिलासाठी असलेल्या संजीवनी लेडीज फिटनेस सेंटरच्या संचालिका सौ. वर्षा राजेश भोसले यांना त्यांच्या या 17 वर्षाच्या यशस्वी व्यवसाय आणि महिला सबलीकरण कार्याबद्दल डी.जी. कॉलेज सभागृहातील समारंभात कोरेगावचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ.प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा लायन वृषाली गायकवाड, विद्या जगदाळे, किर्ती तोडकर बाळासाहेब शिरकांडे. बाळासाहेब महामुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कारा बद्दल वर्षा भोसले यांचे कै.संजय भोसले स्मृती प्रतिष्ठान, जयवंतदादा भोसले मित्र समूह, लोकमान्य क्रीडा मंडळ, अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ, वूमेन्स पॉवर फौंडेशन आणि विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले.


