सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार ज्ञानेश्वर महाराज बंडगर व शारदाताई गुरु पवार यांना जाहीर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार पंढरपूरचे तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि असंघटित क्षेत्रातील बिडी कामगारांच्या महिला नेत्या शारदाताई गुरु पवार यांना देण्यात येणार आहे.
सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार पंढरपूरचे तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि असंघटित क्षेत्रातील बिडी कामगारांच्या महिला नेत्या शारदाताई गुरु पवार यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता येथील शाहू कला मंदिर येथे होणार आहे.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार व अनुभव कथनांचा कार्यक्रम होणार असून बदलेंगे सोच खेल खेल मे ही लघुनाटिका व राम बोलो भाई राम हा लघुपट सादर होणार आहे. निमंत्रितांच्या मेळाव्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी विविध माध्यमातून साजरी होणार आहे.
गौरव पुरस्कार समारोह समितीमध्ये ऍडव्होकेट वर्षा देशपांडे, एडवोकेट शैला जाधव, भाई माने, राजीव मुळ्ये,, कैलास जाधव, शैलेंद्र पाटील, समता जीवन, प्रगती जाधव, मीना सय्यद, एडवोकेट चैत्रा, एडवोकेट वनराज पवार, संजू बोंडे, मीना शिंदे, गौरी आवळे, प्राध्यापक सुवर्णा कांबळे, उषा साळुंखे यांचा समावेश आहे.


