maharashtra

सातारा जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आजादी गौरव यात्रा


भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर आजादी गौरव पदयात्रेचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजादी गौरव यात्रा निघणार आहे .

सातारा :  भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर आजादी गौरव पदयात्रेचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजादी गौरव यात्रा निघणार आहे .
या पदयात्रेच्या नियोजनासंदर्भात आज सातारा जिल्हा काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रभारी श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व तालुकाध्यक्ष व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक घेण्यात आली होती. यावेळी भानुदास माळी, ज्येष्ठ नेते विजयराव कणसे,  प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, महिला अध्यक्ष अल्पनाताई यादव, उपाध्यक्ष निवासराव थोरात, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जाकिर पठाण, कराड तालुका अध्यक्ष दक्षिण मनोहर शिंदे, अन्वर पाशा खान, श्रीकांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेमध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केलेल्या योगदानाचा इतिहास व सामाजिक काम व काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे सुरेश जाधव यांनी सांगितले. जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण म्हणाले,  सातारा जिल्हा हा ऐतिहासिक परंपरा जपणारा जिल्हा असून या जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजादी गौरव पदयात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व कार्यकर्त्यांना सहभागी करण्याचे प्रयत्न करावेत. यावेळी प्रदेश सचिव राजेंद्र शेलार यांनी गौरव पदयात्रेबाबतच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजादी गौरव यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा काँग्रेसकडून प्रत्येक तालुक्याला निरीक्षक नेमण्यात आले आहेत.  यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम ताईयेडगे, विद्या थोरवडे , रजनीताई पवार , धनश्री महाडिक, दत्तात्रय धनवडे, अमीर अत्तार, मनीषा पाटील, बाळासाहेब शिरसाठ, अरबाज शेख, रजिया शेख, संदीप चव्हाण, बाबासाहेब माने, महेंद्र बेडके सूर्यवंशी, पंकज पवार, पांडुरंग यादव, डॉ. गोडसे, कल्याण पिसाळ , मनोज कुमार तपासे, विवेक देशमुख, नंदाभाऊ जाधव आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.