पुसेगाव येथील चंद्रकांत वसंत जाधव यांची सातारा जिल्हा स्वराज्य शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सातारा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्वराज्य शिक्षक संघाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
पुसेगाव : पुसेगाव येथील चंद्रकांत वसंत जाधव यांची सातारा जिल्हा स्वराज्य शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सातारा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्वराज्य शिक्षक संघाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार, सचिव प्रविण देवरे, विशाल देशमुख, संघाचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवडीबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, जिल्ह्यातील आश्रमशाळा, विद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांचे प्रलंबीत प्रश्न शासन दरबारी मांडून सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.


