maharashtra

फलटण प्रतिनिधी:- शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.


Phaltan representative:- Shiv Jayanti festival was celebrated in traditional manner in the city and the surrounding areas. On the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Hindavi Swarajya, the city was celebrated by taking out processions with traditional instruments and grandiose displays
फलटण प्रतिनिधी:- शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती व फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने या दोन्ही उत्सव समितीनी शहरात दोन वेगवेगळ्या मार्गावरून मिरवणुका काढल्या. दरम्यान दोन जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात १४४ कलम लागू केले होते.छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही उत्सव समितीनी मिरवणुका आणण्यास बंदी घालण्यात आली होती यामुळे शिवभक्त मध्ये नाराजी होती. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्या भोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी तालुक्यातील सर्व स्तरातील व्यक्तींनी व नागरिकांनी छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले. शहर आणि परिसरात अनेकांनी आपापल्या घरीही शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी प्रत्येकाने आपल्या घरासमोर भगवे ध्वज लावले होते. 


फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीचे वतीने सकाळी ९ वाजता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी झेंडा दाखवून बाइक रॅलीला सुरुवात केली. श्रीमंत संजीवराजे हे रॅलीत स्वतःही सहभागी झाले होते. मुधोजी क्लब माळजाई मंदिर रोड येथून सायंकाळी ७ वाजता आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवभक्तांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला व मिरवणुकीला सुरुवात झाली. 


फलटण तालुका सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवप्रेमींनी व हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते क्रेनच्या साहाय्याने पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक घातला. त्यानंतर दुपारी ३ वाजता दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता गजानन चौकातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत मुली व महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला व मिरवणुकीला सुरुवात झाली. 


या दोन्ही मिरवणुकीमध्ये डीजे, घोडे उंट, इतिहासातील ऐतिहासिक पात्रे, बैलगाडी संबळवादक, हलगी पथक, लेझिम पथक, केरळी वाद्य, महिला पुरुष झांज पथक, लेझर लाइट्स शो, भव्य देखावे, झेंडे घेतलेले मावळे, तुतारीवादक आदी वाद्यवृंदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान या मिरणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. दोन्ही मिरवणुका पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.