एका प्रवासी बस मधून अज्ञात चोरट्याने पंचवीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : एका प्रवासी बस मधून अज्ञात चोरट्याने पंचवीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास उमा राम लगा राम चौधरी रा. मुंबई हे शिवनेरी बस क्र. एमएच 06 एस 9420 मधून प्रवास करीत असताना ही बस नागठाणे, ता. सातारा येथील दत्तकृपा हॉटेल समोर थांबली. तेथे अज्ञात चोरट्याने चौधरी यांची कॅरेज मधील सॅक मध्ये ठेवलेली पंचवीस हजार रुपयांच्या नोटा असलेली दीडशे रुपयांची सॅक चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


