गोडोली, ता. सातारा येथे घरात प्रवेश करून २ मोबाइलची चोरी करून पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडले असता एकाला मारहाण केल्याप्रकरणी पूनित दिपक पवार, वय २९, रा. साई मंदिरशेजारी, लक्ष्मी किराणा स्टोअरच्या समोर, गोडोली, सातारा याला अटक करण्यात आली आहे.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथे घरात प्रवेश करून २ मोबाइलची चोरी करून पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडले असता एकाला मारहाण केल्याप्रकरणी पूनित दिपक पवार, वय २९, रा. साई मंदिरशेजारी, लक्ष्मी किराणा स्टोअरच्या समोर, गोडोली, सातारा याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी २.४५ वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री बंगला, त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली येथे बंगल्याच्या मागील दरवाजा व खिडकी तोडून पुनीत दीपक पवार याने आत प्रवेश केला. घरातील दोन मोबाइल चोरी करून तो पळून जात असताना अभय सुग्रीव लेंगरे याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता पुनीत पवार याने त्याच्या चेहऱ्यावर दुखापत करून त्याला मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पुनीत पवार याला अटक करण्यात आली आहे.


