onearrestedforstealingmobilephoneatgodoli

esahas.com

गोडोली येथे मोबाइलची चोरी करून मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

गोडोली, ता. सातारा येथे घरात प्रवेश करून २ मोबाइलची चोरी करून पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडले असता  एकाला मारहाण केल्याप्रकरणी पूनित दिपक पवार, वय २९, रा. साई मंदिरशेजारी, लक्ष्मी किराणा स्टोअरच्या समोर, गोडोली, सातारा याला अटक करण्यात आली आहे.